सोलापूर – प्रभाग क्रमांक २४ मधील सर्वात मोठी आणि ज्वलंत समस्या म्हणजे २२ सोसायट्या’ परिसराचा प्रश्न, या भागात फॉरेस्ट विभागाच्या आरक्षणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून घरांची खरेदी-विक्री बंद आहे. हजारो कुटुंबे मानसिक, आर्थिक आणि कायदेशीर अडचणीत सापडलेली असताना सत्ताधारी पक्षाकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही हा प्रश्न आजतागायत मार्गी लागलेला नाही.
भाजप सत्तेत असताना देखील २२ सोसायट्यांचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला आहे. विद्यमान आमदारांनी फक्त बैठका घेऊन, चर्चा करून भूलथापा देण्याचे काम केले. प्रत्येक निवडणुकीत आश्वासनांचे गाजर दाखवायचे, मतं घ्यायची आणि नंतर नागरिकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवायची हेच चित्र गेली अनेक वर्षे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, हा परिसर कायम भाजपाच्या मागे असताना देखील नागरिकांना आजतागायत ठोस न्याय मिळालेला नाही. याउलट, माजी उपमहापौर राजेश काळे यांनी अधिकार नसतानाही प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे.गटर, पाणीपुरवठा, मीटर, अंतर्गत रस्ते, नागरी सुविधांचे प्रश्न त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून सोडवले. त्यामुळे २२ सोसायटी परिसरात राजेश काळे यांना लक्षणीय मताधिक्य मिळणार हे चित्र आज स्पष्ट दिसत आहे.
या महापालिका निवडणुकीत प्रभागात सतीश म्हस्के, उषा राजेश काळे, शैलजा राठोड आणि विकास कदम हे सर्व स्थानिक, तळागाळातील लोकांशी थेट जोडलेले उमेदवार आहेत.परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, राजेश काळे यांच्याव्यतिरिक्त आजपर्यंत एकाही नगरसेवकाने या भागात ठोस विकासकामे केलेली नाहीत. नागरिकांनी अनुभवातून हे पाहिले आहे, म्हणूनच यावेळी केवळ चेहरे नाही तर काम करणाऱ्या नेतृत्वालाच मत देण्याचा ठाम निर्णय जनतेने घेतलेला दिसत आहे.
प्रभाग क्रमांक २४ मध्ये आता परिवर्तनाची लाट स्पष्ट आहे.
खोटी आश्वासने, फसवी बैठका आणि केवळ निवडणुकीपुरते राजकारण नाकारून, विकास, प्रश्नांची सोडवणूक आणि सातत्याने संपर्कात असणारे नेतृत्व नागरिकांना हवे आहे.म्हणूनच यावेळी हक्काचे मतदान भाजपाला न होता शिवसेनेला होणार असून, प्रभागातील जनतेने स्पष्ट विश्वास व्यक्त केला आहे की आता खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवणारे प्रतिनिधी निवडून येतील.


















