करकंब : हिंदू धर्मामध्ये सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला जातो.मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान ,दान आणि सूर्यदेवांची उपासना करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. त्या अनुषंगानेच करकंब ता.पंढरपूर येथेही नवीन वर्षाच्या सुरुवातीस येणारा मकर संक्रांत हा सण सुवासिनींनी परिसरातील श्री.चौंडेश्वरी,श्रीसंत सावता माळी,श्रीराम मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येत मोठ्या उत्साहाने साजरा केला.मकर संक्रांतीचे हळदी,कुंकू म्हणजे सुवासिनींचा एक सामाजिक आणि धार्मिक सोहळाच असतो.
जो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालतो.हरभरे,बोरे,ऊस,गव्हाच्या ओंब्या,तीळ अशा गोष्टी सुगडात घालून त्या देवीदेवतांना अर्पण करण्यात आल्या.सुवासिनींनी एकमेकींना हळदी,कुंकू लावून तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत एकमेकींना तिळगुळ,वाण,भेटवस्तू दिल्या.जे सौभाग्य,समृद्धी आणि सौंहार्यदेचे प्रतीक मानले जाते.मकर संक्रांतीचा सोहळा हा नवीन वर्षाची सुरुवात व सकारात्मक ऊर्जेचा काळ मानला जातो.भारत हा कृषिप्रधान देश असल्याने कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडित अनेक सण समारंभ साजरी केले जातात.
या दिवसांमध्ये शेतात व मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण सुवासिनींनी एकमेकींना दिलेया.काळात ब्रह्मांडामध्ये सकारात्मक लहरींचे प्रमाण वाढते.या सणानिमित्त महिला एकत्र आल्याने त्यांच्यातील संवाद वाढण्यास मदत झाली.तिळगुळ घ्या गोड बोला या संदेशामुळे स्त्रियांमधील निर्माण झालेली कटुता नष्ट होऊन एकमेकींविषयी प्रेमभावना वाढण्यास मदत झाली.




















