देगलूर : देगलूर येथील जेतवन शैक्षणिक, सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट सुजायतपूर यांच्या तिसरी अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही बौद्ध धम्म परिषद महिलांचा मानसन्मान, पुरस्कार, न्याय, हक्क आणि धम्म चळवळीला दिशा देणारी ठरली.
देगलूर तालुक्यातील सुजायतपुर येथील मागील तीन वर्षांपासून जेतवन शैक्षणिक, सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट सुजायतपूर यांच्या वतीने तिसरी अखिल भारतीय राष्ट्रीय महिला बौध्द धम्म परिषद आयोजित करण्यात येते. यंदाही या धम्म परिषदेत दि. १८ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्षा प्रा. छायाताई बोरकर, (गोंदिया) तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रणिताताई गौतम कांबळे (उमरखेड) होत्या. भारतीय राष्ट्रीय महिला बौध्द धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून प्रियाताई खाडे (चंद्रपूर), तर प्रमुख वक्त्या ॲड. विजयमाला मनवर (नांदेड) होते. या बौद्ध धम्म परिषदेस पूजनीय भंते पय्याबोधी (खुरगांव नांदुसा नांदेड) व भिक्खू गण उपस्थित होते.
या राष्ट्रीय महिला बौध्द धम्म परिषदेची सुरुवात
भिख्खू संघाच्या हस्ते ध्वजारोहण करुन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्षा प्रणिता कांबळे, उद्घाटक प्रियाताई खाडे, अध्यक्षा छायाताई बोरकर, संस्थेचे अध्यक्षा सावित्रीताई अडकुते शेवाळकर, सौ. सुनंदा राम वाघमारे नंदुरकर, अनिता रमेशराव शिवणीकर, सुमित्रा खरे आदीं उपस्थित होते.त्यानंतर भंतेजी व भंते गण यांच्या उपस्थितीत नागरिकांनी पंचशील, त्रिशरण ग्रहण केले. या बौद्ध धम्म परिषदेस भंते पय्याबोधी यांनी धम्मदेशना दिली. तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात ॲड. विजयमाला मनवर, डॉ. पुजा सचिन गायकवाड, सुमित्रा खरे, मयुरी अडकुते आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या राष्ट्रीय महिला बौध्द धम्म परिषदेत माईंड लाईट मीडियाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकाचे प्रकाशन भंते पय्याबोधी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या धम्म परिषदेत जेतवन शैक्षणिक, सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट सुजायतपूर यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, कला, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता आदीं क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र, संविधानाची उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले. यात सुजाता पोहरे (साहित्य), ज्योती परांजपे (साहित्य), रूपाली वागरे (साहित्य) नांदेड, सुनंदा वाघमारे (शैक्षणिक), सुरेखा भिमराव माळगे (सामाजिक), रेणुका पंडित वाघमारे (सामाजिक), दीक्षा देविदास वाघमारे (सामाजिक), सामाजिक, सत्यभामा भीमराव दिपके (आरोग्य), डॉ. पूजा सचिन गायकवाड (आरोग्य), अनिता रमेश सोनकांबळे शिवणीकर (सामाजिक), उर्मिला मलगिलवार (सामाजिक), डॉ.सुनिता वनंजे (शैक्षणिक), शैलजा लोणे नांदेड (सामाजिक), मंदाकिनी गच्चे (सामाजिक), लक्ष्मीबाई वाघमारे नंदुरकर (सामाजिक), शांताबाई वाघमारे नंदुरकर (सामाजिक), सुरेखा मुकुंद ढवळे (सामाजिक), कु. प्रियंका रवींद्र जाधव (शैक्षणिक), कु. सोनाली ईबितवार शहापूर (क्रीडा), शिला सुरेश नरोटे (पोलीस पाटील), वैशाली शांतेश्वर भालेकर (पोलीस पाटील), नागमणी माधव कांबळे (महाराष्ट्र पोलीस), सुप्रिया लालू सोनकांबळे (प्रशासकीय), सुमित्रा खरे (सामाजिक) माहुर, मिनल मिलिंद कांबळे, सुनिता अनिल कांबळे, पंचशीला चिंतामणी, शेषाबाई घाटे, रमाबाई कांबळे मुजळगा, वैशाली शांतेश्वर भालेवार (शेवाळा), रमाबाई कांबळे सुजायतपुर आदीं महिलांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी दै. तरुण भारतचे प्रतिनिधी मिलिंद वाघमारे, अहिल्याबाई कांबळे, अंजली भुरे, त्रिरत्न बुद्ध विहार महिला मंडळ खानापूर, शाक्यमुनी बुद्ध विहार पाळा, महिला मंडळ अशोक सम्राट बुद्ध विहार शहापूर, शेवाळा महिला मंडळ, आयु. व समस्त महिला मंडळ तमलुर, महिला मंडळ सुजायतपूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी कु. अनिषा दोडके व ,प्रा. भीमराव दिपके सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन मोहन अडकुते यांनी मांडले.
























