Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तुकाराम भवन येथील गाळे  विस्थापितांना द्यावेत, कराराची पूर्तता करावी

तरुण भारतbyतरुण भारत
March 11, 2026
in editor
0
तुकाराम भवन येथील गाळे  विस्थापितांना द्यावेत, कराराची पूर्तता करावी
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – नगरपरिषद व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर  यांच्या मध्ये संत तुकाराम भवन बांधताना झालेल्या कराराबाबतची पूर्तता तात्काळ करावी  अशी मागणी येथील पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक सौरभ थिटे पाटील यांनी केली आहे. या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना त्यांनी निवेदन देखील दिले आहे.

आपल्या या मागणी संदर्भात माहिती देताना नगरसेवक सौरभ थिटे पाटील यांनी सांगितले की,येथील संत तुकाराम भवनच्या जागेवर पंढरपूर शहर विकास आराखड्यात पूर्वी वेगळे आरक्षण होते. संत तुकाराम भवनची जागा मंदिरे समितीला देण्यात आली त्यावेळेस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व पंढरपूर नगरपरिषद यांचे मध्ये सामंजस्य करार झाला. त्या करारातील अटींचा भंग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने केला आहे. त्या काळातील काही बाबींची तात्काळ पूर्तता करणेत आली. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर मंडपाच्या खालील बाजूस काही दुकान आहेत ती मंदिरे समितीने पंढरपूर नगर परिषदेकडे हस्तांतरित केले. ते सर्व गाळे पंढरपूर नगरपरिषदेकडून १९८२ मध्ये जे विस्थापित झाले होते त्यांना देण्यात आले. त्याचे डिपॉझिट व भाडे पंढरपूर नगरपरिषदेला आज सुद्धा मिळत आहे.

दरम्यान पालिका आणि मंदिर समितीच्या मधील करारातील दुसरी अट जी होती ती संत तुकाराम भवन बांधताना तळमजल्यावर तुकाराम भवनच्या सर्व बाजूने गाळे काढण्यात यावेत. समोरच्या ( फ्रंट साईडला) बाजूला चार गाळे मोठे काढावेत, त्यातील दोन गाळे नगरपरिषदेला देण्यात यावेत व दोन गाळे मंदिर समितीने त्यांच्याकडे ठेवावेत. तुकाराम भवनच्या तीनही बाजूस दुकानात गाळे काढावेत व ते सर्व दुकान गाळे नगर पालिकेकडे हस्तांतरित करावीत. पंढरपूर नगरपरिषदेने ते सर्व गाळे १९८२ मध्ये शहर विकास आराखड्यामध्ये विस्थापितांना (बाधीतांना) द्यावेत असे करारात ठरले होते.

दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने संत तुकाराम भवन बांधताना त्या पद्धतीने बांधकाम केले. मात्र पंढरपूर नगरपरिषदेने त्याचा पाठपुरावा न केल्याने ती नगरपरिषदेकडे हस्तांतरित न करता त्या दुकान गाळ्याच्या बाहेरच्या बाजूने भिंत बांधली व तेथील शटर्स आतल्या बाजूला लावली. आपण याची पाहणी करू शकता आज देखील संत तुकाराम भवन मध्ये जो भोजन कक्ष आहे त्या भोजन कक्ष हॉलच्या पूर्व बाजूस पाच,पाच फुटाचे शटर्स लावलेली दिसतील. आतल्या बाजूचे ही शटर्स लावण्याची काय आवश्यकता होती ? कारण बांधकाम परवाना नगर परिषदेने देताना दुकान गाळ्यासहित बांधकाम परवाना दिला होता.

मात्र वापर परवाना देताना त्याबाबत नगर परिषदेने योग्य लक्ष दिले नाही. नगर परिषदेने योग्य लक्ष दिले असते तर अंदाजे ४० ते ५० दुकान गाळे १९८२ च्या विस्थापितांना मिळाले असते. आता नगर परिषदेने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून सर्व दुकान गाळे दिलेल्या बांधकाम परवान्या प्रमाणे तयार करून घ्यावेत व ते दुकान गाळे १९८२ च्या विस्थापितांना, दुकानदारांना व तुकाराम भवन जागेतील बाधितांना अग्रक्रमाने देण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक सौरभ थिटे पाटील यांनी केली.

या वेळी पंढरपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक लक्ष्मण भाऊ शिरसट, नगरसेवक अमोल डोके, नगरसेवक सुनील वाळूजकार, नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, नगरसेविका अर्चना शिंदे, नगरसेविका संध्याताई शेंबडे, माजी नगरसेवक संग्राम अभ्यंकर, समाजसेवक शरद बापू माने, अशोक पिंटू शिंदे माजी नगरसेवक किरण घाडगे उपस्थित होते.

Post Views: 44
Previous Post

महिला सक्षमीकरण सप्ताह उत्साहात; विविध उपक्रमांतून महिलांचा गौरव

Next Post

लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

लोकविकास विद्यालयात महिला सक्षमीकरण सप्ताह संपन्न

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915232

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697