सोलापूर – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (सीएसएससी ) व प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र ( आरआरटीसी ) यांच्यावतीने आणि सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघांच्या शिखर समितीच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या यंदाचा “समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी दत्ता भोसले यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रमेश डी. पोतदार हे होते. याप्रसंगी मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांच्या हस्ते भोसले यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी महापौर मनोहर सपाटे, प्रा शंकरराव साळुंखे, प्रा. विलास मोरे, माजी प्राचार्य डॉ. अनिल बारबोले, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार आदींनी भोसले यांचे अभिनंदन केले आहे.


























