Sunday, August 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगरपालिका प्रशासनाकडून वाहतूक शाखेच्या पोलीसांना नो एन्ट्रीचे पत्र वारंवार मागणी करुनही मिळेना

तरुण भारतbyतरुण भारत
January 25, 2026
in crime
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – शहरात अवजड वाहनांची रीघ सुरु असल्याने नागरिकांना व शालेय मुलांना जीव मुठीत घेवून रस्ते ओलांडावे लागत आहेत. दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीसांनी पंढरपूर बायपास रोड व मरवडे रोड येथे जड वाहनास प्रवेश बंद असे फलक लावूनही बिंधास्तपणे वाहन चालक अवजड वाहने शहरात आणत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून नगरपालिका प्रशासनाने अवजड वाहतूक थांबविण्यासाठी नो एन्ट्री आदेशाची प्रत पोलीस प्रशासनास देणे गरजेचे आहे.

मंगळवेढा शहरातून रात्रंदिवस अवजड वाहने तसेच ऊसाने भरलेली डबल ट्रेलरची वाहने बिंधास्तपणे दिवसरात्र सुरु आहेत. दामाजी चौक शहराचे ह्रदय म्हणून ओळखले जाते. येथेच माध्यमिक प्रशाला व ज्यु. कॉलेज तसेच काही अंतरावर पंचायत समिती कार्यालय व बसस्थानक असल्याने या चौकात मोठी गर्दी नेहमीच असते. यापुर्वी जवळपास अवजड वाहनामुळे डझनभर लोकांचा जीव गेला असतानाही नगरपालिका प्रशासन मात्र गांधारीच्या भूमिकेत आहे. अजून किती लोकांचा जीव जाण्याची नगरपालिका वाट पाहते असा प्रश्नही सुज्ञ नागरिक व जेष्ठ नागरिक प्रशासनास करीत आहेत. पंढरपूर बायपास व मरवडे रोड येथे अवजड वाहने शहरात येवू नये म्हणून कमान बसविण्यात आली होती. मात्र ती वाहनांनी पाडल्याने आता वाहनांचा मुक्तसंचार शहरामधून सुरु आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीवरुन पंढरपूर रोड व मरवडे रोड या दोन ठिकाणी अवजड वाहनास नो एन्ट्री असे फलक लावलेले आहेत मात्र बाहेरच्या राज्यातून आलेले वाहन चालक पोलीसांना  नो एन्ट्री आदेशाची प्रतची मागणी करीत आहेत.

नगरपालिकेच्या हद्दीतून हा रस्ता गेल्याने ही सर्व जबाबदारी नगरपालिकेची असून नगरपालिकेने नो एन्ट्री आदेशाची प्रत पोलीस प्रशासनास देण्याची गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाने या बाबत नगरपालिकेला पत्र व्यवहार करुनही नगरपालिका तोंडावर बोट हाताच घडी या अवस्थेत असल्याने नागरिकांना मात्र जीव मुठीत धरुन दामाजी चौकातून रस्ते ओलांडावे लागत आहेत. जिल्हाधिकारी यांनी या कामी गांभीर्यपुर्वक लक्ष घालून नगरपालिका प्रशासनाचे कान टोचावेत अशी मागणी या निमित्ताने शहरवासीयामधून पुढे येत आहे.

पोलीसांनी जवळपास आत्तापर्यंत 15 ते 16 बॅरीकेटस लावली होती. मात्र ही बॅरीकेटस वाहनचालकांनी मोडतोड केल्याने याचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. शहरालगत असलेला बायपास रोड मध्यंतरीच्या पावसामुळे अत्यंत खराब झाला आहे. मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे याच्या त्रासाला कंटाळून वाहन चालक शहरातून वाहन नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही माहिती समोर येत आहे. पोलीस प्रशासनाने दि.16 डिसेंबर रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना लिखीत पत्र देवून शहरात नो एन्ट्री बाबतच्या अधीसुचनेची प्रत मिळणेबाबत पत्रव्यवहार करुन जवळपास तब्बल एक महिना उलटूनही नगरपालिका चिडीचूपच आहे.

दि.26/5/2025 रोजी प्रांत कार्यालयात सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत शहरातून होणारी अवजड वाहतूक रोखण्याकरिता मिटींग झाली होती. या मिटींमध्ये 3.5 मिटर उंचीची कमान बसविणे,तसेच मरवडे व पंढरपूर रोडवर 10 बाय 10 फुटाचे रिफ्लेक्टर नो एन्ट्रीचे बोर्ड बसविणे,गुगल व इतर मॅपवर रस्तेबाबत बदल करुन घेणे आदी निर्णय सदरच्या मिटींगमध्ये झाले होते. या बैठकीत घेतलेले निर्णय होवून तब्बल आठ महिन्याचा कालावधी लोटूनही नगरपालिका प्रशासनाचा अद्यापही या घटनेचे गांभीर्य न समजल्याने शहरातून वाहतूक बिंधास्तपणे सुरु आहे. आता तरी नगरपालिका प्रशासन दखल घेवून पुढील कार्यवाही करणार का? असा संतापजनक सवाल शहरवासीयांनी नगरपालिका प्रशासनास केला आहे.

फोटो ओळी

शहरात अवजड वाहने येवू नयेत यासाठी पंढरपूर रोडवर नो एन्ट्रीचे फलक लावल्याचे छायाचित्रात दिसत आहेत. (छाया-प्रथमेश राजे नागणे

Post Views: 55
Previous Post

जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरी मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

समर्पित ज्येष्ठ” विशेष सन्मान पुरस्कार सोलापूरचे दत्ता भोसले यांना प्रदान 

ताज्या बातम्या

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

किरकोळ वादातून तरुणाचा तिघांकडून खून

August 8, 2026
महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार हल्ला विरोधी समितीवर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती

August 8, 2026
ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

ग्रामपंचायत अधिकारी दक्षिण तालुकाध्यपदी रमेश गायकवाड, सज्जाद काझी यांची सचिवपदी निवड

August 8, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये सोलापूरचे पहिले बजाज STEP ईव्ही प्रशिक्षण केंद्र सुरू!

August 8, 2026

सोलापुरात १५ नोव्हेंबरला मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 

August 8, 2026
मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

मिडवाईफपासून मेट्रनपर्यंतचा ३१ वर्षांचा सेवाप्रवास

August 8, 2026
शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

शिवशाही फाउंडेशनच्या वतीने जि. प. प्राथमिक मराठी शाळा बादोले बु. येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 8, 2026

बार्शी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यावरील गुन्ह्याच्या तपासाला उच्च न्यायालयाची स्थगिती 

August 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1039436

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!