पंढरपूर – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द. ह. कवठेकर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विद्या देवी जाधव यांनी प्रशालेस नुकती सदिच्छा भेट दिली. सन २०१७ मध्ये त्या स.मो.वाहन निरीक्षक ही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून सध्या सोलापूर रिजन मध्ये कार्यरत आहेत.
प्रशालेत रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी प्रशालेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. स. मो. वा. निरीक्षक विद्यादेवी जाधव यांनी प्रशालेला भेट दिल्यानंतर विद्यार्थी दशेतील आपल्या आठवणींना उजाळा दिला. याच वेळी त्यांनी मुलींनी एमपीएससी परीक्षा करून आरटीओ क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी असल्याचे सांगितले. यावेळी दहावीच्या विद्यार्थिनींना त्यांनी ‘रस्ता सुरक्षा नियम व महत्त्व बद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. कुलकर्णी, समीर दिवाण, प्रशांत मोरे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पर्यवेक्षक आर.एस.कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.























