सोलापूर – मौजे कौठाळी ते वैराग जाणारे रोडवर पुरूषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडुन सोलार प्लेट पासुन वीज निमिर्ती करण्याचे काम चालु आहे. या ठिकाणी कॅबीनच्या समोर ठेवलेले एकूण 8 लाख 78 हजार 190 रूपये किंमतीचे सोलार प्लेट व पॅनलचे स्ट्रक्चरचे अँगल दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी 11 वा. ते दि. 18 जानेवारी 2026 रोजीचे 10 वा. सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले म्हणुन आदित्य भाऊसाहेब जाधव, रा. शारदादेवी नगर, मोहोळ रोड वैराग ता. बाशी जि. सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस दि, 19 जानेवारी 2026 रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला. गुन्हयाचा तपास पोना/अनंत चमके, याचेकडे देण्यात आला होता.
गोपनिय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मौजे कौठाळी येथील सोलार प्लेट व पॅनेलच्या अँगलची चोरी मौजे कौठाळी येथील एकूण 5 संशयित आरोपी यांनी केली. कौठाळी येथे जाऊन संशयित आरोपी यांच्या ठावठिकाणाची माहिती घेऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार यांनी संशयित आरोपी यांच्या ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन आजुबाजुस शोध घेतला असता 5 संशयित आरोपी मिळुन आले. त्यांना गुन्हयाच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन त्या सर्वाकडे विचारपूस करून तपास केला असता त्यांनी सुरूवातीस उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर सर्वांना अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देऊन त्याचे सोबत आणखीन 2 विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून चोरी केलेले सोलार प्लेट व पॅनेल स्ट्रक्चर अँगल चोरी करणे करीता वापलेले 2 लाख रूपये किंमतीचे अशोक लेन्लड कंपनीचे दोस्त मॉडेलचे मालवाहतुकीचे चारचाकी वाहन व गुन्हयात चोरीस गेलेले 7 लाख 65 हजार रूपये किंमतीचे 102 गौतम कंपनीचे सोलार प्लेट व 1 लाख 13 हजार 190 रूपये किंमतीचे 147 नग धातुचे सोलार पॅनलचे स्टचर अँगल असा एकूण 10 लाख 78 हजार 130 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हयाचा अधिक तपास पोना/चमके हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर, राहुल आत्राम, परिविक्षावीन सहायक पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोहवा/राहुल महिंद्रकर, पोना/अनंत चमके, पोना/लालसिंग राठोड, पोकों/पैंगबर नदाफ, पोकों/वैभव सुर्यवंशी व पोकों/सागर शिंदे यांनी बजावली आहे.
























