बार्शी – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात भाजपचा विजय संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या लक्षणीय उपस्थितीत अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.
मेळाव्यात ऍड. अनिल पाटील, अनिल डिसले, बाबा कापसे, सुधीर बारबोले, घोडके, संतोष निंबाळकर आणि रमेश पाटील यांनी एकजुटीने काम करुन ग्रामीण भागातील सत्ता मिळवण्याचे आवाहन केले.
अरुण कापसे यांनी, ‘निवडणूक अटीतटीची आहे; ही कार्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेची लढाई समजून मैदानात उतरा’, असे सांगितले.
शिंदे सेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, महायुती म्हणून आम्ही काम केले. राजाभाऊंनी सेनेला सहा जागा देऊन निवडुन आणल्या. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. शिंदे सेनेत काही झारीतील शुक्राचार्य आहेत. काहींना महाप्रसाद मिळाला नसेल. मशालीच्या चिन्हावर आमदार असताना. त्यानी अभद्र युती केली आहे. महाराष्ट्रामध्ये लाचनास्पद अशी बार्शीतील विरोधकांची युती आहे. उद्धव ठाकरे यांना ही केलेली गद्दारी आहे. राजाभाऊचे नेतृत्व तालुक्याने मान्य केले आहे. मशाली शेजारी बाण पाहताना आमचं काळीज जळत आहे. विरोधकांची महाआघाडी नसून महाबिघाडी आहे, अशी टीका केली.
माजी आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले , प्रचंड गर्दी आणि मते आपल्याकडे आहेत. सन्मानाने मते घ्या, जनतेला विकासाची आस आहे. विरोधी लोक स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. शेतीला पाणी, एमआयडीसी, गावांचा विकास, दळणवळण ही महत्त्वाची कामे आहेत, ही आपण करत आहोत. लाखो कोटींची गुंतवणूक राज्यात येणार आहे. बार्शीत तीन एमआयडीसी करायचे आहेत. भविष्यात तालुक्याला विकासाच्या दृष्टीने चांगले दिवस येणार आहेत. माझा शब्द दुसऱ्याच्या वाईटासाठी मी कधी वापरणार नाही. तो चांगल्यासाठी वापरत आहे. पैकीच्या पैकी जागा जिंकून द्या. राज्यातील नेते आपल्या विरोधकांना दारात सुद्धा उभा करणार नाहीत. आपण शिस्तीत निवडणूक जिंकू. मला चिडवले तरी चिडणार नाही. मी तुमची कशी गंमत करतो ते बघा, असे आव्हान त्यानी दिले. कार्यकर्त्यांनी नाराजी असेल तर ती माझ्याजवळ बोला. मी ती दुरुस्त करतो. बाहेर नाराजी व्यक्त करु नका. कार्यकर्त्यावर परिणाम होईल असे वागू नका. विरोधकांचे काहीच मेरिट नाही. गावागावात कोण काय करतय हे मला समजणार आहे. पंधरा महिने झालं पाहतोय. तालुक्याचे मोठे नुकसान झाले. विनाकारण आम्हाला टार्गेट केले जात होते. गैरसमज करुन घेऊ नका. शिवरायांना गुरु मानून राजकारण करत आहे. अख्खी इस्टेट पार्टीसाठी लावणार आहे. पूर्ण टेक्निक वापरत आहे. फक्त रिझल्ट चांगला नव्हे तर पैकीच्या पैकी जागा द्या. गैरसमज करु नका विरोधकांना तीनदा पाणी पाजू. कार्यकर्ते आणि मतदार यांना दैवत माना असे आवाहन केले.
सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष केशव घोगरे यांनी केले.























