मुदखेड – येथील पी एम श्री केंद्रीय विद्यालय सीआरपीएफ मुदखेड येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती पराक्रम दिनानिमित्त “परीक्षा पे चर्चा” या प्रधानमंत्री मोदीजींच्या उपक्रमांतर्गत “ऑपरेशन सिंदूर” व “स्वदेशी” या विषयांवर जिल्हास्तरीय प्रश्नोत्तरी चे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालय नांदेड, केंद्रीय विद्यालय मुदखेड, जवाहर नवोदय विद्यालय शंकर नगर तसेच इतर सीबीएससी व राज्य शासनाच्या शाळांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये मध्य चरण (वर्ग ६ ते ८) मधील जवळपास ५० तसेच माध्यमिक चरण (वर्ग ९ ते १२) मधील जवळपास ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेतील दोन्ही चरणांमधील तीन-तीन विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अजय चौकीकर व प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक पांडुरंग फाजगे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक लंकेस मस्के,चंद्रभान, सचिन बासोडे, प्रशांत जटाल, सौरभ श्रीवास्तव व नसीमा बेगम यांचा सक्रिय सहभाग लाभला.
























