उमरी – अमरावती येथे ज्युनियर बेसबॉल राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेत उमरी शहरातील मॉर्डन इंग्लीश स्कुलने कौतुकास्पद कामगीरी करून उमरी शहराचे नाव उज्जवल केले आहे .
अमरावती येथे दिनांक २२ ते २३ जानेवारी २०२६ रोजी पर्यंत बेसबॉल स्पर्धा घेण्यात आली महाराष्ट्र स्टेट बेसबॉल स्पर्धेत १९ व्या चॅम्पियनशिप स्पर्धा मध्ये उमरी येथील माॅडर्न इंग्लिश स्कूलचे इयत्ता १० वीचे विद्यार्थीनीं संघाने उत्तम कामगिरी करुन शाळेच्या वैभवात भर पाडली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांनी देखिल ह्याच खेळात चांगली कामगिरी केली आहे. सदरील स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथमच सहभाग नोंदविला होता. अमरावती येथून चांगली कामगिरी पार पाडून हे खेळाडू दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी उमरीस परत आले. उमरी रेल्वे स्थानकावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कुलकर्णी आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
माॅडर्न इंग्लिश स्कूलचे ह्या संघात सोनल सुरबुलवाड, अक्षरा बिजमवार, साक्षी वाडीकर, श्रृती माचनवाड, वैभवी यम्मेवार, ऋदायणी बोडके, निहीता बुंदेलकर, ओंकार पवार, शौर्य उत्तरवार, ऋतुराज ढगे ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. शाळेच्या सहशिक्षिका सौ. निलिमा वर्मा यांनी संघाचे कोच म्हणून काम पाहिले. सदरील शाळेच्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स अधिकारी आनंदराव कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे व पालकांनी ही आनंद व्दिगनित केला आहे .


















