इस्लापूर – शाळेतील चिमुकल्याचा उत्साह द्विगुणित व्हावा म्हणून. व त्यांच्या गुणकौशल्याचे कौतुक व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इस्लापूर येथील जी.एम. पब्लिक स्कूल मध्ये आनंदनगरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये जवळपास 51 खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या पालकांनी व मातांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाच्याप्रसंगी प्रथमता शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले व सरस्वती देवीच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कांगणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रोहिणी डोळस, युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे मराठवाडा संघटक परमेश्वर पेशवे, बीट जमादार कविता वाघमारे, गोपनीय शाखेचे अरुण मडावी, पोलीस जमादार शिंदे, विकास माहुरकर पत्रकार या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या शाळेच्या संचालिका सौ मीना मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला,
या कार्यक्रमास विद्यार्थ्याचे पालक गजानन कदम ग्रामपंचायत सदस्य , दिनेश जयस्वाल, बाबुराव जाधव, निलेश पळसपूरे, शेख लतीफ, विकास माहुरकर, विनोद गंदेवार, नारायण गोरठे, गणेश पोतुलवार, इंदल आडे, साईनाथ पळसपुरे, सौ मीना पालेपवाड, भाग्यश्री बैनवाड रेखा मुंडे, यांच्यासह अनेक महिलांनी उपस्थिती दर्शवली होती. आनंद नगरी हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मारुती मुंडे तुकाराम शिंदे प्राध्यापक रावसाहेब कदम बालाजी राजुरवाड अतिश मुनेश्वर ,गंगाधर बैनवाड, पांडुरंग केंद्रे, शैलेश पळसपुरे, आदित्य कदम, ज्योती भोसले, विजया कुंडलवाड, नागेश्री माहूरकर, सुरेखा शेळके, अमोल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

























