लोहा – बुद्धकिर्ती चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्या वतीने देण्यात येणारा व अतिशय सन्मानाचा समजला जाणारा भीमयोद्धा पुरस्कार यावर्षी लोहा येथे समता सैनिक दलामध्ये सामाजिक कार्य करत असलेल्या सुभाष विठ्ठल खाडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
३१ जानेवारी रोजी सायंकाळी रमाई बुद्ध विहार सहयोगनगर, नांदेड येथे एका भव्य सोहळ्यामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे
भारतीय सैन्यात, पोलीस दलात आणि समता सैनिक दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक कार्य करणाऱ्या जवानांना हा पुरस्कार दिला जातो.
यावर्षी नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील नांदेड दक्षिण भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा तालुका शाखेमध्ये अनेक दिवसांपासून धार्मिक कार्य करत आहेत
समता सैनिक दलातील कार्याची दखल घेऊन सुभाष खाडे यांची बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्ट निवड समितीने निवड जाहीर केली.
रमाई बुद्ध विहार सहयोग नगर येथे स्टार प्रवाहाचे छोटे उस्ताद गायिका अंजली गडपाळे आणि सुप्रसिद्ध गायक सुरेश रंजवे यांच्या बुद्ध भिम गिंताचा कार्यक्रम ही होणार आहे या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती बुद्ध किर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश कोकरे, सचिव राजेश बि-हाडे, सहसचिव प्रविण कुपटिकर, कोषाध्यक्ष सुभाष मल्हारे, सदस्य रमेश सुर्यवंशी, भिमराव सोनाळे, साहेबराव पुंडगे यांनी जाहीर केले
या निवडी बद्दल लोहा भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब कापुरेसह आंबेडकर चळवळीतील अनेकांनी सुभाष खाडेचे अभिनंदन केले.

























