पारध – भोकरदन तालुक्यातील पारध येथे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवाड्या अंतर्गत पारध येथे नवीन शिधापत्रिका (राशन कार्ड) तयार करण्याचे अभियान राबविण्यात आले होते.
या अभियानाचे फलित म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर आज पारध येथे अपंग व विधवा माताभगिनींना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहेत
हे अभियान माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे व
मा. उपविभागीय अधिकारी . बी सर्वानन (IAS), मा. तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे , नायब तहसीलदार सदानंद नाईक, संदीप गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले आहेत.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर पाटील लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली व सामिजिक कार्योकर्त सागर देशमुख यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला .
या कार्यक्रमात पंचायत समिती
सदस्य गणेश पाटील लोखंडे,
माजीसरपंच गणेश पाटील लोखंडे, दिलीप पाटील लोखंडे,
सागर श्रीवास्तव, रहीमभाई,
अखिलभाई, असलमभैया, संदीप काटोले , प्रशांत सुरडकर यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले आहेत.
या उपक्रमामुळे गरजू, अपंग व विधवा महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळणार असून उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले.
तसेच प्रशासन व स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहेत
- (परमेश्वर पाटील लोखंडे (माजी पंचायत समिती सभापती)
“देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचत आहेत.
सेवा पंधरवाड्यासारख्या उपक्रमातून सामान्य, अपंग व विधवा माताभगिनींना न्याय मिळतो आहे,
ही अभिमानाची बाब आहे.
माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारध सारख्या ग्रामीण भागातही विकासाची गंगा पोहोचली आहे.
राजकारण हे सत्तेसाठी नसून समाजसेवेचे माध्यम आहे,
हे आजच्या शिधापत्रिका वाटपातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पारध गावातील प्रत्येक गरजू नागरिकाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू असलेली ही विकासाची लढाई अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे.”
( सागर देशमुख (सामजिक कार्यकर्ते)
शिधापत्रिका हा फक्त कागदाचा तुकडा नसून तो गरीब कुटुंबांच्या स्वाभिमानाचा आणि जगण्याच्या आधाराचा कागद आहे. अपंग, विधवा माताभगिनींना जेव्हा शासनाचा हक्क त्यांच्या हातात देताना पाहिले, तेव्हा या उपक्रमामागची मेहनत सार्थकी लागल्याची भावना मनात दाटून आली.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे आपल्या हक्काच्या शिधापत्रिकेसाठी वणवण फिरत होती. त्या प्रत्येक चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाजसेवेसाठी घेतलेला हा संकल्प योग्य असल्याची खात्री मिळाली.
शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, कोणताही गरजू उपाशी राहू नये,
हाच या उपक्रमामागील माझा प्रामाणिक उद्देश आहे.
पारध गावातील प्रत्येक गरजू कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा सेवायज्ञ अखंडपणे सुरूच राहील.”
सदानंद नाईक (नायब तहसीलदार अन्नपुरवठा विभाग भोकरदन)
शासनाच्या अन्नसुरक्षा व अन्नपुरवठा धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
पारध येथे राबविण्यात आलेल्या नवीन शिधापत्रिका अभियानामुळे अनेक अपंग व विधवा महिलांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळाला आहे, ही समाधानाची बाब आहे.
सेवा पंधरवाड्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
योग्य कागदपत्रांची पडताळणी करून पारदर्शक पद्धतीने शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.
पुढील काळातही कोणताही पात्र नागरिक शिधापत्रिकेपासून वंचित राहू नये, यासाठी अन्नपुरवठा विभागाच्या वतीने आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील.

























