बार्शी – संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा बार्शी व वैराग यांच्यावतीने अमृत प्रोजेक्ट अभियान राबविण्यात आले.
बार्शी येथील गणेश तलाव या ठिकाणी मंडळाच्यावतीने जलस्वच्छ म्हणजेच तलावातील असलेला कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. संपूर्ण भारतभर संत निरंकारी मंडळाच्यावतीने हे अभियान सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आदेशाने बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त अभियान राबविण्यात आले.
या अभियानासाठी बार्शी ब्रांच मुखी शशिकांत शिंदे, वैराग ब्रांच मुखी अंगत अंबुरे, बार्शी युनिटची सेवादल अधिकारी किशोर ढोले व ऋषिकेश शेळके वैराग युनिटचे सेवदल अधिकारी चंद्रकांत उंबरे, नागनाथ अंकुश, राजेंद्र चव्हाण, विक्रम क्षीरसागर आणि सेवादल व संगत तसेच शब्बीर वस्ताद (आरोग्य विभाग) व नगरपालिका सफाई कर्मचारी यांचे सर्वांचे सहकार्य लाभले.























