पंढरपूर : आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराला सजावट करण्यासाठी पुण्यातील एका भविकाने तब्बल १ टन द्राक्ष दिले. दारम्यान, हे द्राक्ष आज सकाळी अर्ध्या तासात गायब झाले आहेत. हे द्राक्ष नेमके कुणी खाल्ले असा प्रश्न द्राक्ष दिलेल्या भविकाने विचारत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
एकादशीनिमित्त पंढरपूरला दरवर्षी विविध सजावट करण्यात येते. प्रामुख्याने हंगामी फळा, फुलांनी मंदिराची सजावट केली जाते, आज फाल्गुन शुद्ध आमलकी एकादशी असल्याने पुण्यातील बारामती येथील भाविक बाबासाहेब शेंडे, पूनम शेंडे आणि सचिन चव्हाण यांनी तब्बल १ टन द्राक्षांचे मनी देत मंदिराचा गाभारा सजवला होता. मात्र केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाली. आज सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरु झाले आणि अर्ध्या तासात द्राक्षाचा एकही मनी शिल्लक राहिला नाही.
दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्षांचे घड कोणी पळवले याची चर्चा सुरु या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शोध मंदिर प्रशासनाने तातडीने लावावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत अशी मागणी विट्ठल भक्तांनी केली आहे.