मौजे इटकळ येथील रहिवाशी अर्जुन तानाजी पांढरे (वय ५० वर्ष) हे इटकळ बस स्टँड वरून सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घरी येत होते अगदी इटकळ चौकात आले असता सोलापूरहून द्राक्ष घेऊन हैद्राबाद कडे जाणारा करवा ट्रान्सपोर्ट आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.१३ सी.यू.६१०४ या आयशरने सायकल स्वार अर्जुन पांढरे यांना जोराची धडक देऊन पन्नास फूट फरफटत नेले त्यामुळें जबर मार लागल्याने अर्जुन पांढरे यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना सोमवार दि.६ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास इटकळ येथील राष्ट्रिय महामार्गावर घडली.
सहाय्यक पोलीस निरिक्षक सिद्धेश्र्वर गोरे यांना अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पाठवून पुढील कार्यवाही करून वाहतूक सुरळीत केली. इटकळ येथे दिवसेंदिवस वाढती रहदारी लक्षात घेता येथे सर्व्हिस रस्ता होणे गरजेचे आहे मात्र गेल्या चार वर्षांपासून सतत राष्ट्रिय महामार्गच्या संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी सर्व्हिस रस्ता होणेसाठी कल्पना देवुन ही अद्याप येथे सर्व्हिस रस्ताच झाला नाही त्यामुळे गेल्या वर्षभरात पंधरा ते वीस अपघात झाले असून तीन जणांना प्राण गमवावा लागला आहे.
याला सर्वस्वी या राष्ट्रिय महामार्गाचा गलथान कारभार आणि संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचेच ग्रामीण परिसरातून बोलले जात आहे. आता तरी महामार्ग च्या संबंधित अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून इटकळ येथे सर्व्हिस रस्ता करावा अन्यथा आणखी किती जणांना नाहाक प्राण गमवावे लागेल हा येणारा भविष्यकाळच ठरवेल. अर्जुन पांढरे यांच्या निधनाने गावं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.