शहरातील जालना रोड परिसरातील रमाबाई नगर परिसरातील एका महिलेच्या पतीने गळ्याला पट्ट्याने बांधून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दिनांक 13 मार्च सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून शहरात खळबळ उडाली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील जालना रोड वरील रमाबाई नगर येथील रहिवाशी राजू अवचर हे मागील काही दिवसांपासून मनोरुग्ण असल्यामुळे औरंगाबाद येथे उपचार घेत होता घटनेचा काही दिवस अगोदर माहेराला असलेल्या पत्नीला घेऊन आला होता दरम्यान तो मनोरुग्ण असल्यामुळे मयताचे नातेवाईकांनी पाठवण्यास नकार दिला होता परंतु घरात लग्न असल्याचे सांगून आपल्या पत्नीला सासरी आणले होते
दरम्यान दि.12 मार्च रात्री अडीचच्या सुमारास पत्नी सुनीता अवचर वय 24 वर्ष हि झोपेत असताना पत्नीच्या गळ्यात कमरेचा पट्टा बांधून पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच पोलिसांना माहिती देण्यात आली यावेळी घटनास्थळी पो.नि.कुदनकुमार वाघमारे,पो.उप.नि.चौरे,सपोनी विकास कोकाटे,पो.का.जोगदड, कांबळे,चव्हाण,बंदुके आदींच्या पथकाने धाव घेत घटनास्थळावरून बेशुद्ध अवस्थेत विवाहित महिलेस नातेवाईकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉ देवीदास गरड यांनी तपासून मृत घोषित केले मृत विवाहित महिलेस एक तीन वर्षांचा मुलगा आहे.
यावेळी ग्रामीण रुग्णालयात मृताच्या नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती दरम्यान आरोपी राजू अवचार यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.