मंद्रुपमधील शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावरील औदयोगिक वसाहत बोजा कमी करण्यासाठी आंदोलनाला बसलेल्या शेतकर्यांनी मंगळवारी मुख्यमंञ्यांच्या निवासस्थानापर्यंत बैलगाडी मोर्चाला सुरूवात केली.यावेळी मळसिध्द देवालयापासून बैलगाडी मोर्चाला सुरूवात करण्यात आले असून यामध्ये अबालवृध्दांसह महिला शेतकरीही सहभागी झाले आहेत.मंद्रुप येथील नियोजित एमआयडीसी साठी शेतकर्यांच्या उताऱ्यावर चुकीच्या पद्धतीने बोजा लावण्यात आले आहे.
उतार्यावरील बोजा कमी न झाल्याने मंगळवार , दिनांक १४ मार्च रोजी आंदोलक ८० ते ९० शेतकर्यांनी बैलगाडी व पायी मोर्चाला सुरूवात केली आहे. शेतकरी प्रशासनाकडून उतार्यावरील बोजा कमी करून उतारा कोरा करूनच मंद्रुपला परत येणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयापासून मुंबई येथील मुख्यमंत्री यांच्या वर्षानिवास स्थानापर्यंत बैलगाडी व पायी मोर्चा घेऊन जाणार असल्याची माहिती आंदोलनर्कर्ते शेतकरी महादेव गुरण्णा कुंभार व प्रवीण कुंभार यांनी दिली.यावेळी गजानन शेंडगे , महानिंग मेंडगुदले, अनिल मेंडगुदले , बाळु शेंडगे , मलकारी जोडमोटे , राम कुंभार , बसवराज कुंभार , मलकारी गुंजाटे , अप्पासाहेब मेंडगुदले , अमोगसाध्द तड्डे , कुमार मेंडगुदले , संजय मेंडगुदले , दयानंद मेंडगुदले , सिध्दाराम गुंजाटे , यांच्यासह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते .