शहरासह तालुकाभरात घरफोडीचे प्रमाण वाढले असून नुकतेच शहरातील माजी नगरसेवकांचे घरफोडून कपाटातील सोने व चादीचे जवळपास तीन लाख 31 हजारांची भरदिवसा चोरी झाली असून याकडे पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने नागरीकातून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विविध गावात दिवसा व रात्रीच्या वेळेस घर फोडीचे प्रमाण वाढले असून त्यात शहरातील माजी नगरसेवक मन्मथ सुगावे यांच्या घरी दुपारच्या वेळी घरातील कुटुंब बाहेर गावी गेल्याचे पाहून घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटाचे लॉकरचे कुलूप मोडून आतील चार तोळे सात ग्रॅम सोने व 48O ग्रॅम चांदीचे दागिने व 56 हजार 500 रुपये रोख असा एकुण 3 लाख 31 हजार मुद्देमाल भर दुपारी अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना घडली आहे .
असे प्रकार येरोळ , थेरगाव , सुमठाणा , तळेगाव अशा अनेक गावात चोरीचे प्रकार घडलेले आहेत . अशा सर्रास चोर्यामुळे नागरीकातून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . याकडे पोलीस कर्मचारी मात्र बघ्याच्याच भुमिकेत असल्याने तीव्र असंतोष निर्माण होत आहे . या शहरातील घरफोडीच्या घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक निकेतन कदम यांनी भेट देवून पाहणी करत अज्ञात चोरट्याच्या विरोधात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .