आई एकविरा देवीचा पालखी सोहळा 28 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रातील लोणावळ्यात कार्ल्याच्या लेणी जवळ आई एकविरा देवीचे मंदिर आहे.आगरी-कोळी समाजाचे बांधव येथे आईच्या पूजेसाठी येतात.हे कुणबी समाजाच्या लोकांची कुलदैवत देखील आहे. या मंदिरामध्ये एकसारख्या बांधणीची एका ओळीत बांधलेली मूळच तीन मंदिरे पश्चिममुखी आहे.अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्रात येथे भाविकांची गर्दी ओसंडून येते. येथे पशुबळी देण्याची प्रथा देखील आहे. हे देवस्थान जागृत आहे. ही देवी चमत्कारिक आहे.ही देवी आई नवसाला पावणारी आहे.महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्याने येथे सतत वर्दळ असते.आगरी कोळी समाजाचे भाविक येथे पूजेसाठी येतात .चैत्र महिन्यात या मंदिरात पालखी सोहळा होतो. चैत्र महिन्यात भाविकांची गर्दी असते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...