छत्रपती संभाजीनगर: मंगळवार दि.९ मे ला देशभर हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करावेत असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने आणि मंदिर विश्वस्तांनी केले आहे.
काही पक्ष, संस्था राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त आणि हिंदू हितैशी संघटनावर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे व त्यांच्यावर बंदी घालण्याचे जाहीर
मत प्रकट करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रद्रोही निष्प्रभ व्हावे समाजाचे प्रबोधन व्हावे आणि समाजाची हनुमत शक्ती जागृत व्हावी याकरिता या सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रमाचे ठिकठिकाणी मोठ्या व भव्य प्रमाणावर आयोजन देशभर होत आहे.
प्रत्येक जिल्ह्यातही अशा सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात यावे याकरिता सर्व मंदिरांनी आणि भाविकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन विश्व हिंदू परिषद आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलींदजी परांडे, बजरंग दल राष्ट्रीय संयोजक निरज दौनेरिया,श्री.दयाराम बसेय्ये [ बंधू] श्रीरामचंद्र मंदिर मठ बालाजी संस्थान कीराडपूरा ,श्री.प्रदिपजी पिंगे वरद गणेश मंदिर-डॉ.प्रविण वक्ते गजानन महाराज मंदिर गारखेडा परिसर- श्री.नरेंद्र देव -श्री.समर्थ राममंदिर.श्री.सतिश वैद्य
श्री.रेणुका माता मंदिर – जळगाव रोड-श्री.प्रफुल्ल मालानी संस्थान गणपती मंदिर – राजा बाजार
डॉ.रमेश लड्डा-इस्कॉन- अदालत रोड- श्री.श्रीपाद कुलकर्णी
श्री.भक्ती गणेश मंदिर सिडको एन १,
श्री.मनोज सकलेचा-श्री.रेणुका माता मंदिर झांबड इष्टेट- श्री.सुधाकरराव टाक-श्री साईबाबा मंदिर कवठा नांदेड, श्री.दिलीपराव कंदकुर्ते -श्री.रेणुकामाता मंदिर गाडीपुरा नांदेड,साहेबराव पवार-श्री.साईबाबा मंदिर किनवट, व्यंकटराव सातूरवार श्रीराम मंदिर किनवट,गजानन लाडकर- श्री.बालाजी मंदिर किनवट रमेशचंद्र दायमवार- श्री गजानन महाराज मंदिर किनवट यांनी केले आहे.