पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपााखाली त्यांनी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर इम्रान खान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर इम्रान खान यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानमधील अनेक शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना इस्लामाबाद कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने मंगळवारी त्यांना अटक केली आहे. इमरान खान यांच्या पक्षाचे नेते मुसर्र्त चीमा यांनी ट्वीट करत अटक करणारे सुरक्षा अधिकारी यांनी इमरान खान यांना टॉर्चर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच इमरान खान यांना मारहाण केल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. पीटीआयने जो व्हिडीओ ट्विट केला आहे की, त्यात इमरान खान यांचे वकील जखमी दिसत आहे.
इस्लामाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांनी व्यक्त केली नाराजी
इमरान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अटक करताना कोर्टाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. कोर्टात दाखल होण्याअगोदरच इमरान खान यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधिशांनी 15 मिनिटक इस्लामाबादचे आयजी, गृहसचिव यांना तातडीने बोलवले आहे. जर 15 मिनिटात आयजी आणि गृहसचिव नाही आले तर मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
इमरान खान यांना मारहाण केल्याचा वकिलांचा दावा
इमरान खान यांच्या वकिलांनी इमरान खान यांच्या जीवाला धोका असल्याचे यापूर्वीही कोर्टात सांगितले होते. इमरान खान कोर्टात येण्यापूर्वी त्यांच्या भोवती कायम सुरक्षा कवच असायचे. पीटीआय या इमरान खान यांच्या पक्षाने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे त्यामध्ये इमरानच्या वकिलांनी इमरान खान जखमी असल्याचा दावा केला आहे.