CBSE: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी निकाल पाहू शकतात. बोर्डाने टॉपर्सची यादीही जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी थोडी चांगली आहे. तर मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली आहे.
सीबीएसई दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि इतर तपशील आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी निकालाची प्रत डाउनलोड करा आणि निकालपत्रात दिलेली इतर माहिती देखील तपासा. त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्या.
यंदा सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या. इयत्ता दहावीची परीक्षा २१ मार्च रोजी संपली आणि १२वीच्या परीक्षा ५ एप्रिलपर्यंत चालल्या. यावेळी एकूण३८,८३,७१० विद्यार्थी सीबीएसई परीक्षेत बसले. त्यापैकी दहावीचे २१,८६,९४० आणि बारावीचे १६,९६, ७७० विद्यार्थी आहेत. विद्यार्थीअधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त थर्ड पार्टी वेबसाइटवरून देखील निकाल डाउनलोड करू शकतात.