राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते.थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते.
मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्याात आले. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाईल.
गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते
गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Former CM) , खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले होते.
बंडानंतर एकनाथ शिंदेंनी घेतली होती भेट
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात, त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नाही. त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत आहे हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात, त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नाही. त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत आहे हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. या माध्यमातून त्यांची मतं, पाठिंबा आपल्या बाजूने वळवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं.
मनोहर जोशी हे मुळचे बीडचे
मनोहर जोशी हे मुळचे बीडचे आहेत. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली त्यानंतर ते मुंबईत स्थायिक आहे.