मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक यंदा चुरशीची होणार यात शंका नाही. दरम्यान राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य केले आहे. मुंबई महापालिकेवर कोणाचा महापौर बसणार यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक यंदा चुरशीची होणार यात शंका नाही. दरम्यान राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य केले आहे. मुंबई महापालिकेवर कोणाचा महापौर बसणार यावर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “युतीची सत्ता आल्यास कोणाचा महापौर बसणार याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे याबाबतचा निर्णय घेतील आणि युतीचा महापौर बसेल”, असे देसाई म्हणाले. शंभूराज देसाई यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. “संजय राऊत हे पोपट आहेत.दरवेळी नवनवीन चिठ्ठी काढत असतात.चुकीची चिठ्ठी काढत असल्यामुळे त्यांचा मालक ही त्यांना कंटाळेला आहे”, असा टोला देसाई यांनी लगावला.