पालम – प्रतिनिधी धोंडीराम कळंबे :- तालुक्यातील पेठ शिवणी येथील विनायक विश्वनाथ गुरव यांचे केदार किराणा दुकानासह धनंजय करंजे यांच्या घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दिनांक 27 मे शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पेठ शिवणी तालुका पालम येथील विनायक विश्वनाथ गुरव यांचे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेच्या समोर असलेल्या केदार किराणा दुकानात विद्युत वायरला शॉर्टसर्किट होऊन आग लागली. त्यामध्ये किराणा दुकानातील सामानासह गोदामातील साठवलेल्या शेतीमाल असा एकंदरीत 12 लाख रुपयाचे तर धनंजय करंजे यांच्या घरातील शेतीमाल व संसार उपयोगी साहित्य जळून अंदाजे तीन लाख रुपये असे एकूण या घटनेत अंदाजे 15 लाख रुपये किमतीचे शेतीमाल, दुकान शटर , घरांचे व त्यामधील सामानाची नुकसान झाले असल्याची माहिती पालम पोलीस स्टेशनला आणि महसूल विभागाला देण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठे शर्तीचे प्रयत्न केले असून गंगाखेड नगरपालिकेची अग्निशामक दलाचे वाहन मदतीसाठी आले होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...