मुदखेड तालुक्यातील बारड भोकर महामार्गाजवळच्या शेतात पुरुष जातीचा व्यक्तीचा मृतदेह आढळला. बारड शिवारात अज्ञात मयताचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना घडली असुन या घटनेची माहिती दि.२७ रोजी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पाहनी करुण याबाबत बारड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारड शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ लगत असलेल्या चंद्रप्रकाश दाड यांच्या गट नंबर २४६ रिकाम्या शेत शिवारात अज्ञात मयताचा कुजलेल्या अवस्थेत पडलेला मृतदेह आढळल्याची खबर देणारे ज्ञानेश्वर पवार हे गुरांना चारा पाणी करण्यासाठी गेले होते तेंव्हा त्यांना महामार्गाजवळच्या शेतावर पुरुष जातीचा व्यक्तीचा मृतदेह असुन कुजून काळवंडलेल्या स्थितीत नग्न अवस्थेत ज्याचा उजवा पाय कमरेपासून नसलेल्या व्यक्तीचा मृतदेह दिसून आला.
आजूबाजूला पाहणी केली असता महामार्ग लगतच्या नालीत जमीन काळवंडलेली दिसत असल्याने कुठल्यातरी प्राण्याने प्रेत नाली पासून शेतात वडत असल्याच्या खुणा त्या ठिकाणी आढळल्या तर त्या ठिकाणी दोन जुन्या कपड्याचे गाठोडे दिसून आले यावरून तो भिकारी असावा व कुठल्यातरी कारणाने मयत झाला असावा असे प्रथमदर्शनी दिसुन आले आसल्याच्या माहिती वरुन बारड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरक्षक शिवराज तुगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वानोळे पो.हे.का. कारंजकर करीत आहेत.