कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे, महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. सर्वांनी महिलांच्या पाठिशी उभं राहायला हवं. तसेच गौतमी पाटीलला पाठिंबा द्यायला हवा, असं म्हणत स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गौतमी पाटीलचं समर्थन केलं आहे.
गौतमी पाटीलने तिचं पाटील आडनाव काढाव का? याबद्दल प्रतिक्रिया देत संभाजीराजे म्हणाले,”महिलांनी आपले गुण आणि कर्तृत्व दाखविलं आहे. सात वर्ष ताराराणीने औरंगजेबाशी लढा दिला तेव्हापासून महिला सबलीकरण सुरू झालं आहे आणि शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिला आहे. कलाकरांना संरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे”.