महाराष्ट्रात वारंवार भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून तसेच राज्याच्या राज्यपालांकडून महापुरुषांची बदनामी केली जात आहे. त्याविरोधात सोलापुरात अनेक राजकीय पक्ष एकवटले असून येत्या 16 डिसेंबर शुक्रवारी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येऊन हा बंद यशस्वी करू असा निर्धार करण्यात आला.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे गटाचे अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, नाना मस्के, भाजपचे अनंत जाधव, मनसेचे प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर यांची उपस्थिती होती.
अमोल शिंदे म्हणाले, आपल्या महापुरुषांबाबत कायम आदर आहे, 16 तारखेचा बंद हा मध्यवर्तीच्या नावाखाली केला जातोय, महाविकास आघाडी मध्यवर्ती महामंडळा च्या खांद्यांवर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे
स्वताच्या पक्षाच्या बँनर वापरावा पण मध्यवरती बँनर खाली बंद पुकारण्यास आमचा विरोध आहे
केवळ आपापल्या नेत्यांना खुश करण्यासाठी हा बंद करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरला जाणार आहे, आम्ही या बंदमध्ये सहभागी होणार नाही, सर्व व्यवहार सुरळीत चालू राहतील, शाळा सुरू राहतील या शब्दात अमोल शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.