नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून बोगस कागदपत्रांच्या आधारे तब्बल चार कोटींचा विमा लाटल्याचे समोर आले आहे. यासाठी संशयितांनी खून करत अपघात झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर एका महिलेस पत्नी असल्याचे बोगस वारस दाखवत तब्बल चार कोटींचा विमा स्वतःच्या नावावर केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे.
नाशिकच्या मुंबई नाका पोलीस हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका महिलेसह पाच संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या वर्षी 2 सप्टेंबर 2021 ला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ अशोक भालेराव मृत अवस्थेत आढळले होते. मात्र या घटनेत खून करून अपघात झाल्याचा बनाव रचत पाच संशयित आणि मयत व्यक्तीच्या विम्याचे तब्बल चार कोटी रुपये दुसऱ्याच महिलेला त्याची पत्नी म्हणून बोगस वारस दाखवत विमा क्लेम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात एका महिलेसह पाच संशयतांना रात्री उशिरा मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.