पंतप्रधान मोदींना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, सुशिलकुमार शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक वापरत होते तसंच उपरण, पगडी, मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. नमामी गंगे प्रोजेक्टसाठी मोदींना एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मोदींच्या हस्ते आज मेट्रोचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसंच अनेक विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...