भेंड (ता. माढा) येथे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत गावामध्ये ‘एक कुटुंब – एक वृक्ष’ मोहीम सुरू करण्यात आली.अभियानाच्या चौथ्या टप्प्याला सुरवात करण्यात आली. आदर्शनगर येथे वृक्षारोपण करून या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक परिवारासस वड, पिंपळ, चिंच, करंज, लिंब, अशोक, भेंडी, काटेसावार, आंबा, खदीर कदम, अशा विविध प्रकारच्या एक हजार वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी या वृक्षांचे व्यवस्थित संगोपन करणार असल्याची प्रतिज्ञा यावेळी घेतली. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण गायकवाड, माजी सरपंच डॉ. संतोष दळवी, पोलिस पाटील माऊली दळवी, सुभाष पाटील, महादेव कुंभार, बाळासाहेब भोगे, माऊली जानराव, सुभाष शिंदे, फारूक मुलाणी, अभी कोरके, शहदत सय्यद, मारुती जाधव, संतोष जानराव, शुभम जाधव, गणेश मुटकुळे, सूरज मुलाणी आदी ग्रामस्थ, महिला तसेच अधिकारी व पदाधिकारी यासह गामस्थ उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...