नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक या बस सेवेच्या ठेकेदारीवरील असलेल्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे .या संपामुळे नाशिककरांचे हाल होत आहे. महानगरपालिका या संपाबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नाशिक मनपाने जुलै २०२१मध्ये शहरात सिटी लिंक बससेवा सुरू केली. त्या पुर्वी नाशिकमध्ये एस.टी. महामंडळाकडून बससेवा चालवली जात होती. मात्र, महापालिकांनी बससेवा चालवावी या भूमिकेतून त्यांनी शहर बससेवा बंद केली. यामुळे नाशिक महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतील विरोधी सदस्यांनी या बससेवेला विरोध केला होता. तरीही शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवणे महापालिकेची जबाबदारी असल्यामुळे ही बससेवा सुरू झाली. महापालिकेच्या माध्यमातून सध्या २५० बसेस सुरू असून यात २०० सीएनजी तर ५०डिझेल बसेस आहेत. याशिवाय २५ इलेक्ट्रिक बस खरेदीची प्रक्रियाही सध्या सुरू आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी सिटीलींकच्या माध्यमातून बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून वाहक व चालकांना कामावरती घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांनी तीन वेळा संप केला आणि तो संपर्क त्याच दिवशी संपला . तर पंधरा दिवसांपूर्वी म्हणजेच 18 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या संप हा दोन दिवस चालला दोन दिवसानंतर महानगरपालिकेने तोडगा काढताना 31 जुलै पर्यंत ठेकेदार सर्व कर्मचाऱ्यांचे पगार आला करेल असे सांगून कर्मचाऱ्यांना कामावरती परतले होते परंतु ठेकेदाराने दिलेल्या आश्वासन पाळले नाही यामुळे ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीच्या तीन दिवसानंतरही वाट बघून आज शुक्रवारी 4 ऑगस्ट पासून संपला सुरुवात केली शुक्रवारी सकाळी सर्वसाधारण सात वाजेपासून या संपाला सुरुवात झाली सर्व कर्मचारी हे पंचवटीतील निमाणी डेपो येथे एकत्र झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व गाड्या लावून संपला सुरुवात केली यावेळी महानगरपालिकेच्या विरोधात देखील संपकरी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली.महानगरपालिकेने पैसे अदा करावे या अशी मागणी आता हे कर्मचारी करू लागले आहेत हा बेमुदत संप असल्याचे देखील या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत महानगरपालिकेची संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही पण या संपावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी बैठक होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्यानंतर प्रशासनाची चांगली धावपळ सुरू झाली आहे कारण चार तारीख केला म्हणजे शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी हे नाशिकमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे त्यापूर्वी संप कसा मिटावावा यासाठी प्रशासन आता प्रयत्न करत आहे