मी मानसी नितीन देसाई. मी माझ्या कुटुंबियांकडून माझं मत सगळ्यांसमोर मांडत आहे. २ ऑगस्ट रोजी माझे बाबा आम्हाला सोडून गेले. त्यानंतर प्रसारमाध्यमांद्वारे त्यांच्याबाबत खूप चुकीची माहिती पसरवण्यात आली. या दुःखद घटनेनंतर त्यांच्यावर कर्ज होतं आणि इतर गोष्टींबाबत चर्चा झाली. त्यांची खरी बाजू आणि त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं? हे आम्ही प्रसार माध्यमांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. कर्ज १८१ कोटी रुपयांचं होतं आणि आम्ही ८१.३१ कोटी रुपयांचं कर्ज फेब्रुवारी २०२० पर्यंत फेडलं होतं. त्यानंतर करोनाकाळात संपूर्ण जगच थांबलं. बॉलिवूडलाही याचा खूप मोठा फटका बसला. बाबांकडे कामं नव्हती म्हणून स्टुडिओ बंद करावा लागला. याचमुळे नियमीत कर्ज फेड करणं शक्य झालं नाही. त्याच्याआधी रोनल्ड कंपनीने आमच्याकडून सहा महिन्याचं आगाऊ पेमेंट मागितलं होतं. तेव्हा माझ्या बाबांनी पवईचं ऑफिस विकून ती मागणी पूर्ण केली. मी महाराष्ट्र शासनाला विनंती करते की, त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे एनडी स्टुडिओ तुम्ही ताब्यात घ्या. तसेच त्यांना न्याय मिळवून द्या.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...