तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना आज मंगळवारी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेय. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याशी बाचाबाची केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
राज्यसभेत आज, मंगळवारी मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी यासाठी विरोधकांचा गोंधळ सुरू होता. यादरम्यान टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी उभे राहून मणिपूर मुद्द्यावर चर्चेची मागणी लावून धरली. यादरम्यान सभापतींनी त्यांना शांत राहण्याची सूचना केली. ब्रायन यांनी त्यांच म्हणणे न ऐकल्याने सभापती नाराज झाले. सभापतींनी डेरेक ओ ब्रायन यांना खडे बोल सुनावले. टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सभापतींच्या खुर्चीकडे पाहून आरडाओरड करत पॉइंट ऑफ ऑर्डर दिले होतं. यानंतर सभापती धनखड यांनी पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे? असे विचारताच डेरेक ओ ब्रायन आणि मोठ्याने ओरडले आणि आपण कम्युनिकेट केले पाहिजे अशी मागणी करू लागले. मणिपूर मुद्द्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. यानंतर सभापती नाराज झाले आणि त्यांनी जर कोणत्याही सदस्यास पॉइंट ऑफ ऑर्डर पाहिजे असेल मात्र उभे राहून तो देत नसतील. आणि त्यावर भाषण द्यायला सुरू करत असतील तर हे योग्य नाही.नुसतीच स्पेस हवी असेल तर ते बरोबर नाही. यानंतर धनखड यांनी, तुम्ही कोणत्या नियमानुसार पॉइंट ऑफ ऑर्डर देत आहात ते मला सांगा असे विचारलं. यावर डेरेक ओ ब्रायन यांनी उत्तर दिले की, रुल पेज 92 वर असून नियम 267 आहे. विरोधी पक्षाचे नेते सतत मणिपूरवर चर्चेची मागणी करत आहेत, असे म्हणत ब्रायन ओरडू लागले.
यादरम्यान भाजप खासदार पीयूष गोयल यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला आणि डेरेक ओ ब्रायन यांना राज्यसभेत निलंबित करण्यात आले. यानंतर लगेच सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह यांना देखील गोंधळ घातल्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवशेनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले होते.