पक्षात फाटाफूट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे १३ ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने गुरुवारी दुपारी पक्षाच्या कार्यालयात बैठक बोलावली. परंतु, यावेळी युवक अध्यक्ष पदावरून दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी युवक कार्यकर्त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. युवक कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज झाला होता. हा वाद म्हणजे घरातील किरकोळ वाद होता. पक्ष म्हणजे आमचे घर आहे. आम्ही त्यांची गैरसमज दूर केल्यानंतर सर्व कार्यकर्ते हातात हात घालून परतले. निवडीत कोणावरही अन्याय होणार नाही.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...