घातपात घडवणे आणि दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आठ जणांना भंडारा पोलिसांनी शस्त्रासाठयासह अटक केल्याची धक्कादाय घटना शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक येथे उघडकीस आली आहे.वसीम उर्फ टिंकू खान (२३) रा.भंडारा,विनायक नेवारे,शहाबाद साबीर खान,प्रकाश भालाधरे,संकेत बोरकर,संजय पाटील,रोहन ठाकरे रमेश खोब्रागडे सर्व रा. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीत्यांची नावे आहेत.
दरम्यान भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात अंधाराच्या फायदा घेऊन लपून बसले असल्याची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या गांभीर्याची दखल घेत त्यांना घेराव घालत ताब्यात घेतले तसेच त्यांच्या दोन वाहनांची तपासणी केली असता यामध्ये शस्त्रे,मिरची पावडर,दोरी,हॉकी स्टिक,लोखंडी रोड,चाकू,काठ्या आढळून आले आहेत हे सर्व आरोपी भंडारा येथील वाशिम उर्फ टिंकू खान यांच्या संपर्कात असल्याची कबुली दिली.वसीम उर्फ टिंकू खान हा भंडारा येथील रहिवासी असून भंडारा जिल्ह्याच्या फूटपाथ युवनीयनचा जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती समोर आले आहे.