गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव-कोहमारा महामार्गावरील मुर्दोली जंगल परिसरात कारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरिता नागपूरला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सदर नर वाघ हा नागझिरातील टी- 14 वाघिणीचा 2 वर्षाचा बछडा होता. लसकाळ पासून त्याला रेस्क्यू करण्याचे अभियान सुरू होते. दरम्यान वाघाला जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर वाघाला नागपूर ला नेतांनी वाटेतच त्या वाघाचा मृत्यू झाला.वाघ गंभीर जखमी झाल्याने तो हालचाल करू शकत नव्हता, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. पुढील कारवाई नागपूर गोरेवाडा येथे आज दुपारी होणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...