चंद्रपूर शहराजवळील दाताळा येथील काही युवक स्वातंत्रदिनी अमलनाला धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते. शुभम शंकर चिंचोळकर (३२) या युवकाने डॅमच्या वेस्ट वेअर पाण्यात उडी मारली. मात्र शुभमला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने तो बुडाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.