रशियाचं लुना 25 हे अंतराळयान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं असल्याची माहिती रशियाने दिली आहे. हे अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या बेतात होतं. मात्र प्री-लँडिग ऑर्बिटमध्ये गेल्यावर त्यात काही समस्या निर्माण झाल्या. सोमवारी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी हे अंतराळयान चंद्रावर उतरणार होतं. चंद्रावर गोठलेलं पाणी आणि इतर काही गोष्टी धरून ठेवतं का हे पाहण्यासाठी हे मिशन आखण्यात आलं होतं. लुना 25 चा संपर्क तुटल्याचं या संस्थेने सांगितलं आहे. ‘अंतराळयान एका अनोळखी कक्षेत गेले आणि चंद्रावर उतरण्याआधी कोसळलं.’ असं रॉसकॉसमॉस या रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...