सोलापूर – महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त १५×१६ फूट आकाराची भव्य आणि आकर्षक रांगोळी साकारण्यात आली. सुमारे १५ किलो रंग व रांगोळी साहित्याचा वापर करून ही सुंदर कलाकृती तयार करण्यात आली आहे. या रांगोळीत जटाधारी महादेवांची प्रभावी आणि भावपूर्ण प्रतिमा रेखाटण्यात आली असून शिवलिंग, त्रिपुंड, चंद्रकोर आणि भक्तिमय पार्श्वभूमी यांचे आकर्षक चित्रण करण्यात आले आहे.
ही रांगोळी रांगोळी कलाकार मल्लिनाथ जमखंडी, रमेश मदभावी आणि कलाश्री जमखंडी यांनी अत्यंत बारकाईने आणि कौशल्याने साकारली आहे. रंगसंगती, छटा आणि सूक्ष्म तपशील यामुळे ही रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने साकारलेली ही कलाकृती मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करत असून उपस्थित नागरिकांकडून तिचे कौतुक होत आहे. कलाकारांच्या परिश्रमामुळे ही रांगोळी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.


























