मंगळवेढा – तू कोणास सोबत बोलत आहेस? तुझे किती बाबा आहेत? असे म्हणून एका 36 वर्षीय महिलेचा हात धरुन जवळ ओढून अंगाशी झोंबाझोंबी करुन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी नितीन चंद्रकांत लटके याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी तथा 36 वर्षीय पिडीत महिला ही दि.24 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील बोराळे नाका बसस्थानकाजवळ असताना आरोपीने जवळ येवून पिडीतेच्या हातातील फोन घेवून तू कोणाला फोन लावत आहेस मला दाखव असे म्हणून पिडीतेच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी पिडीतेने आरोपीस तू माझा मोबाईल फोन का घेतला आहेस? असे विचारले असता त्याने तूला लय मस्ती आली आहे, तुझी मस्ती जिरवते असे म्हणून पिडीतेस जवळ ओढून तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार दत्तात्रय व्हरे हे करीत आहेत.


















