वळसंग, ता.द.सोलापूर येथील शंकरलिंग हायस्कूल मधील शिक्षक सुरेश सिद्राया परशेट्टी वय 56 यांचा शनिवारी दुपारी उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. परशेट्टी हे वळसंग येथून शनिवारी दुपारी दुचाकीवर घरी आले. पाणी पिल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. तेवढ्यात काही कळण्या अगोदरच ते जमिनीवर कोसळले.
त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आले. शवविच्छेदन अहवाला नंतरच मृत्यूचे खरे कारण समजणार आहे. अशी माहिती शिक्षक सुरेश परशेट्टी यांच्या कुटुंबीयांनी दिली. परशेट्टी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते मुळचे केगाव बु. तालुका अक्कलकोट येथील रहिवासी आहेत. त्यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी 12 वाजता नवीन आरटीओ ऑफिसजवळील बेन्नूर नगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. अंत्यविधी तुळजापूर वेस येथील लिंगायत स्मशानभूमीत होणार आहेत.


















