ब्राझीलमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे अनेकांची घरे कोलमडली आहेत. आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे धरणे, नद्या ही भरून वाहत आहेत. त्यामुळे आस पासच्या शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील स्थिती पाहता गव्हर्नर एडुआर्डो लीट यांनी परिसरात आणीबाणी जाहीर केली आहे.
येत्या काही तासांत पोर्टो अलेग्रे शहराला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत.