फूलवळ / नांदेड – नांदेड ते बिदर फूलवळ मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 रस्त्यालगत असे अतिक्रमण काढून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन येत्या दहा दिवसांमध्ये अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले. परंतु या नोटीसीचा अतिक्रमण धारकांवर कसल्याच प्रकारचा परिणाम दिसून येत नाही.
अतिक्रमण काढून घेण्यासाठी दहा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता हा कालावधी संपून जवळपास एक महिना होत आला तरीही अद्यापही अतिक्रमण काढण्यात आले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाला फक्त नोटीस देण्याइतकाच वेळ मिळाला होता का ? हा ही प्रश्न येतील समस्त गावकऱ्यांना पडलेल्या दिसून येत आहे. विभागाने जशी नोटीस देण्याची तत्पर दाखवली तशीच तात्पर्तता अतिक्रमण काढण्यास का दाखवत नाही.
गेल्या चार वर्षापासून फूलवळ येथील रोडचे काम अर्धवट अवस्थेमध्ये सोडून गुत्तेदार पळून गेले आहे. या अर्धवट राहिलेल्या कामामुळे येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात होत असतात. येथे एखादी मोठी जीवितहानी झाल्या शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार नाही का असाही प्रश्न निर्माण होतो ?
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फुलवळ येथील रस्त्याच्या लगत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना नोटीस काढून रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र येथे कोणत्याच अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढण्याची तात्परता दाखवली नाही. फुलवळ येथील राहिलेलाअर्धवट रस्ता करून अतिक्रमण काढून या रस्त्याचा वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल का? असा प्रश्न आता सुज्ञ नागरिकांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
तर या उलट काही नागरिकांनी याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमने करून करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. काहींनी त्यावर व्यावसायिक गाळे काढून मोठ्या प्रमाणावर आर्थिक माया जमवली आहे. ते तर अजूनही अतिक्रमने काढण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जशी या अतिक्रमण केलेल्या जागा स्वतःच्या मालकीच्या आहेत अशा अविर्भावात काही स्थानिक नागरिक आल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे.
नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग फूलवळ गावातून गेल्याने नागरिकांना उदगीर, लातूर,नांदेड येण्या-जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत जवळचा व सोयीचा बनला आहे.
मोठ्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा येथील नागरिकांची होती. मात्र काही दिवसातच या रस्त्याच्या अवस्थेमुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब दर्जेदार रस्ते करा अन्यथा कारवाई करू अशी तंबी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गुत्तेदारांना देत असतात, मात्र या तंबीनंतरही यांना काहीच फरक पडलेला दिसून येत नाही



















