सोलापूर : “शामची आई ” या पुस्तकाच्या एक लाख प्रति वितरण केल्या. प्रत्येकाने पुस्तक वाचन केलेच पाहिजे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर पुस्तके विकावीत. शुभप्रसंगी पुस्तक भेट द्यावे, असे उदगार साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष अशोक खानापुरे यांनी हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, आणि सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर यांनी आयोजित केलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालदिन व ग्रंथालय सप्ताह कार्यक्रमात काढले.
यावेळी साने गुरुजी कथामालेचे कार्यकर्ते आणि सोलापूर वृत्तपत्र लेखक मंचचे माजी अध्यक्ष. अशोक म्हमाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. वृषाली हजारे यांनी केले तर आभार सेविका गीतांजली गंभीरे यांनी मानले. वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी नेहरूंच्या स्मृतींना उजाळा दिला. सदर कार्यक्रमास लक्ष्मीकांत साळी,शशिकांत माने, विनोद ,चंदेले,नितीन चौधरी,अब्दुल रहमान शेख, प्रतीक नकाते, रोहित कुमार राम, संतोष कोरे, ऋषिकेश दांडगे, मल्लिनाथ गोणे, गड्डम यांच्यासह बहुसंख्य वाचक वर्ग उपस्थित होते.


















