पुणे – राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांची घोषणा अखेर निवडणूक आयोगाने केली असून,या घोषणेनंतर ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. सध्याच्या राजकीयपरिस्थितीनुसार; निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे मत व्यक्त करीत मुंबई महापालिका निवडणूक महायुतीने एकत्रित लढावी, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचेराष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१५) केले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांवर भगवा फडकवेल,असा ठाम विश्वास पाटीलयांनी व्यक्त केला.
शहरी भागातील मतदार सध्या सत्ताधाऱ्यांच्या, विशेषतः भाजपच्या कार्यपद्धतीवर समाधानी असल्याचे चित्र दिसतेय.पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेचशहरी विकासाशी संबंधित योजनांमुळे भाजपबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक संघाची वस्ती, भाग निहाय रचना, स्वयंसेवकांचे जाळे भाजपसाठी जमेची बाजू आहे.याचा थेट फायदा आगामी महापालिका निवडणुकांत भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील म्हणाले.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे योग्य सहकार्य भाजपला मिळाले, तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरपालिका देखीलभाजपच्या ताब्यात येईल, असे भाकीत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. सध्या तरी २ हजार ८६९ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत १६ जानेवारी ला कुणाचे पारडे जड ठरणार, हे मतदार१५ जानेवारीला ठरवतील, असे पाटील यांनी नमूद केले.


























