मुखेड ता. प्रतिनिधी :- ऍड.रणजित जामखेडकर
महावितरण कंपनीची एक हजार फूट लांबीची विजेची तार भंगार वाल्याच्या मदतीने पळविणाऱ्या चार चोरट्याविरुद्ध मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा शिवारातील बाबु नुकुलवार यांच्या शेतात महावितरण कंपनीच्या वतीने विज पुरवठा करण्यात आला आहे. त्यांच्या शेतात एक हजार फूट लांब असलेली विजेची तार जोडली होती हे लक्षात घेऊन परिसरातीलच असलेल्या तिन चोरट्यांनी ही तार पळविण्याचा कट रचला असून दि.२७ रोजी रात्री ८ च्या सुमारास तिन चोरट्यांनी नरसी येथील मुर्तुजा सय्यद या भंगार वाल्याशी संपर्क साधून त्याला बाबु नुकुलवार यांच्या शेतातकडे बोलावून घेतले.यादरम्यान चोरट्यांनी महावितरण कंपनीची तार तोडताना पाहून काही नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली
मात्र चोरट्यांनी अंधाराच्या फायदा घेत भीतीने आपली मोटारसायकल एम.एच २६ डब्ल्यु ११९३ (स्प्लेंडर प्लस) व एम.एच २६ सी.एफ ५१३४ (होंडा शाईन) या दोन्ही मोटारसायकल सोडून तिघे जन तेथून पढ काढले होते तर भंगारवाल्याला गावकऱ्यांनी त्याच्या छोटा हत्ती एम.एच १४ ई.एम ५७७१ सहित दोन मोटारसायकली पकडून मुखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता बालाजी सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुखेड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फड हे करीत आहेत.