मुदखेड ता प्र
मुदखेड शहरातील नामांकित असलेली महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक रमेश रामसिंग जाधव सर हे दि.२९ जून २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. या अनुषंगाने महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयच्या प्रांगणात दि २९ जून रोजी सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रा आर.आर.जाधव हे इ.स.२४ जून १९९३ मध्ये महात्मा गांधी विद्यालय येथे रुजू झाले व ३० जून २०२४ रोजी निवृत्त झाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.बाबुराव नाईक सर मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय मुदखेड,
प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष राम चौधरी हे होते तर माजी शिक्षणाधिकारी आनंद वाढे,सचिव लक्ष्मणराव सोनटक्के, उपाध्यक्ष बालप्रसाद सोनी,माजी नगरसेवक उत्तम चव्हाण,किरण देशपांडे, प्रवीण गायकवाड, प्रा. यशवंत कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष राम चौधरी व इतर शिक्षकवृंद यांनी प्राध्यापक आर.आर.जाधव सर यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कौशल्य सर यांनी केले तर आभार अमृत जाधव यांनी मानले.